Marathi

eBook

आधुनिक इतिहासाचे मानबिंदू भाग १ – मराठी

180.00

आधुनिक इतिहासाचे मानबिंदू
ऐकल्याशिवाय बोलता येत नाही. यश जाणल्याशिवाय यशस्वी होता येत नाही.
प्रत्येक क्षेत्रातील यशस्वी उत्तुंग व्यक्तिमत्त्वे जवळून बघण्यासाठी व जाणण्यासाठी… येत आहे – दैनिक ’प्रत्यक्ष’
दैनिक प्रत्यक्षचा पहिला अंक प्रकाशीत होण्याअगोदर या बिगर राजकीय वर्तमानपत्राविषयी त्या वेळेच्या आघाडीच्या मराठी वर्तमानपत्रांमध्ये प्रत्यक्षविषयी एक जाहिरात छापून आली होती. त्यातील वरिल वाक्यांनी वाचकांच्या मनात कुतुहल निर्माण केले होते.
कला असो की क्रीडा, साहित्य असो की व्यवसाय अशा नानाविध क्षेत्रात प्रदीर्घ काळाचा इतिहास अनुभवलेल्या व्यक्ती आपल्यात वावरत असतात. या व्यक्तींच्या इतिहासातील आठवणी, त्यांचा अनुभव पुढच्या पिढीला मिळावा म्हणून ’चालता बोलता इतिहास’ या सदराचे प्रयोजन केले होते. ’आधुनिक इतिहासाचे मानबिंदू’ हे पुस्तक म्हणजे ’दैनिक प्रत्यक्ष’ मधील ’चालता बोलता इतिहास’ या सदरातील लेखमालांचे सुंदर कोलाज्‌. हे पुस्तक दोन भागात प्रकाशीत झाले. व त्यात पुढील मान्यवरांवर लिहिलेल्या लेखमालेतील लेख होते.

Continue reading....
eBook

आधुनिक इतिहासाचे मानबिंदू भाग २ – मराठी

180.00

`आधुनिक इतिहासाचे मानबिंदू’ – भाग २

मुरलीधर शिंगोटे – वृत्तपत्र विक्रेतापासून वितरक आणि वितरकांपासून वृत्तपत्रांच्या समूहाची मालकी हा जीवनप्रवास
बाळासाहेब विखे-पाटील – सहकारक्षेत्रातील प्रभावी आणि आदरणीय अधिकारी व्यक्तिमत्व
अनिल फडके – मनोरमा प्रकाशनाचे मालक. वाचकांची नस ओळखणार्‍या फडके यांचा प्रकाशन व्यवसायातला अनुभव खर्‍या अर्थाने बोलका, आपल्याला अंतर्मुख करणारा आणि त्याचवेळी आपली उमेद वाढविणारा आहे.

Continue reading....

Book
eBook

आपत्कालीन व्यवस्थापन – मराठी

250.00

अनेक आपत्तींची टांगती तलवार सातत्याने मानवाच्या डोक्यावर आहे. नैसर्गिक आपत्ती  उदा. भूकंप , वादळे, पूर , भूस्खलन , दुष्काळ  इ. चे आघात होतच असतात. मानवनिर्मीत आपत्ती उदा. मोठे अपघात , रासायनिक, जैविक व आण्विक  युद्धे यातही जग होरपळून निघतच आहे. या सर्व आपत्तींमुळे जीवितहानी, आर्थिक व सामाजिक नुकसान होते, तसेच पर्यावरणावरही त्यांचा विपरीत परिणाम होतो.

या सर्व पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापनाचे महत्व ही आज राष्ट्रांची प्राथमिक गरज झाली आहे. ह्याची गरज जशी सरकारला आहे, तशीच, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक देशातील नागरिकांना. कारण, कोणत्याही आपत्तीत सर्वसामान्य नागरिकच होरपळून निघतात. यासाठी आपत्कालीन व्यवस्थ्यापनात नागरिकांचा थेट सहभाग आवश्यक आहे. 

Continue reading....

eBook

इस्रायल एक प्रदीर्घ प्रवास – पण यशस्वी! – मराठी

250.00

“इस्रायल – एक प्रदीर्घ प्रवास, पण यशस्वी” हे पुस्तक वाचकाला इस्रायल ह्या राष्ट्राच्या विविध पैलूंची सखोल माहिती करून देते. इस्रायलने आज जागतिक रंगमंचावर महत्त्वपूर्ण स्थान पटकावलेले आहे आणि इस्रायल भारताबरोबर आपली आगळीवेगळी मैत्री राखून आहे. ज्याला ज्याला म्हणून ह्या सगळ्याचा विशाल दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे, त्याने तर हे पुस्तक नक्कीच वाचले पाहिजे. ह्या पुस्तकाच्या लेखिका ‘शुलमिथ पेणकर-निगरेकर’ ह्या एक भारतीय-इस्रायली महिला असून, सध्या त्यांचे वास्तव्य तेल अवीव्ह येथे आहे.

Continue reading....

Book
eBook

गर्द सभोवती – मराठी

350.00

प्रत्येक माणसाच्या जीवनात अनेक व्यक्ती येतात, प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात. काही व्यक्ती मनाच्या खोल खोल कप्प्यात कुठेतरी जाऊन बसतात. बालपणीच्या काही घटना मनात घर करून राहतात. निर्सगाचेही विविध पैलू आपण आपल्या मनात साठवत असतो. अशा अनेक चांगल्या आठवणींची शिदोरी प्रत्येकाकडे असते. आशालता वाबगावकर यांनीही आपल्या जीवनप्रवासातील आठवणींच्या साठवणी लेखमालेच्या स्वरूपात ’दैनिक प्रत्यक्ष’ या बिगर राजकिय वर्तमानपत्रात लिहिल्या व या लेखमाला ’गर्द सभोवती’या पुस्तकात सामाविष्ट करून दि. २६ जून २०१७ रोजी सचिन खेडेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

          संगीत नाट्यसृष्टीत व चित्रपट क्षेत्रात आपल्या कसदार अभिनयाचा ठसा उमटविणार्‍या चतुरस्त्र अभिनेत्री म्हणून आशालता वाबगावकर या रसिकांना परिचीत आहेतच. आशालता यांचा जन्म मुंबईचा. गिरगावातील ‘सेंट कोलंबो हायस्कूल’मधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. तेव्हाच्या अकरावी मॅट्रिकनंतर त्यांनी काही काळ मंत्रालयात नोकरीही केली. त्याच वेळी नोकरी सांभाळून कला शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी’ (एसएनडीटी) महिला विद्यापीठातून त्यांनी ‘मानसशास्त्र’ विषयात ‘एम.ए.’ केले.

          आशालता ह्यांनी विविध भाषांतील शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. ‘दि गोवा हिंदू असोसिएशन’ या संस्थेने महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत सादर केलेल्या ‘संगीत संशयकल्लोळ’या नाटकातील रेवतीच्या भूमिकेतून आशालता वाबगावकर यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. पुढे ‘चंद्रलेखा , ‘मुंबई मराठी साहित्य संघ’, ‘माऊली प्रॉडक्शन’, ‘कलामंदिर’, ‘आयएनटी’ आदी नाटय़संस्थांमधून  त्यांनी  नाटकांचे  प्रयोग केले. ‘मत्स्यगंधा’ या  संगीत  नाटकातील  त्यांची  भूमिका  प्रचंड  गाजली.

Continue reading....
Book
eBook

गुन्हेगारांचे कर्दनकाळ न्यायवैद्यक शास्‍त्र – मराठी

350.00

गुन्हेगारांचे कर्दनकाळ – न्यायवैद्यक शास्त्र– डॉ. वसुधा आपटे

आता अनेक चित्रपट व टि.व्ही. सिरीयल्स मुळे फोरेन्सिक सायन्स (न्यायवैद्यक शास्त्र) ही संकल्पना अनेकांना परिचीत आहे. एखादा गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्ह्याचा फोरेन्सिक रिपोर्ट  गुन्हेगाराला पकडून देण्यास व त्याला कोर्टात योग्य ती शिक्षा देण्यास महत्वाची भूमिका बजावतो. न्यायवैद्यक शास्त्र ह्याबाबत सामान्य माणसांना जरी प्रचंड उत्सुकता असली तरी त्यातील फारच थोडी माहिती असते. डॉ. वसुधा आपटे ह्या न्यायवैद्यक शास्त्रातील प्राध्यापिका व तज्ज्ञ आहेत. अनेक किचकट व अवघड वाटणार्‍या प्रकरणांमध्ये त्यांनी न्यायालयास मदत केली आहे. 

Continue reading....
eBook

डॉ. निकोल टेस्ला

150.00

आपले आजचे जीवन अधिक सुखावह करणार्‍या आधुनिक तंत्रज्ञानाचा जर मागोवा काढला तर त्याचे मूळ, अलौकिक बुद्धीमत्तेचे शास्त्रज्ञ डॉ. निकोल टेस्ला यांच्या संशोधनात आणि त्यांनी लावलेल्या विविध शोधांमध्ये आहे. अभियंता, संशोधक, वैज्ञानिक, भौतिकशास्त्रज्ञ, क्रांतीकारी बदल घडवणारा, दूरदर्शी, भविष्यवादी ही बिरुदावली मानवजातीच्या विकासासाठी या महान वैज्ञानिकाने केलेल्या कार्याचे आणि योगदानाचे वर्णन करण्यास कमी पडेल.

डॉ. टेस्ला यांच्या नावे सुमारे ७०० हून अधिक संशोधनांचे पेटंट आहेत, त्या व्यतिरिक्त त्याांचच्या इतर अनेक शोधांचा उपयोग सामान्य माणसाला पण व्हावा या उद्देशाने त्यांनी त्या शोधांचे पेटंटही काढले नाही.

Continue reading....
 

Book
eBook

तिसरे महायुद्ध – मराठी

250.00
ह्या पुस्तका विषय केवळ दहशतवाद वा दहशतवादविरोधी युद्धा हा नसून, पुढील काळात उलगडत जाणार्‍या जागतिक घडामोडींच्या शक्यतांचा विचार आतापर्यंत घडलेल्या घटनांच्या अभ्यासाच्या आधारे करणे हा आहे. संघर्ष हाच पुढील जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षांसाठी पृथ्वीच्या पाठीवर प्रत्येक ठिकाणी दैनंदिन व्यवहार होणार आहे.
हे भविष्यकथन नव्हे. हा अभ्यास आहे इतिहासाचा आणि सद्य: स्थितीचा आणि हे संशोधन आहे, जागतिक रंगमंचावरील पात्रांच्या मनोगतांचे. पुढे येणार्‍या वीस वर्षात अक्षरश: शेकडो ठिकाणी हजारो घटना घडणार आहेत तर येथे फक्त मोजक्या दहांचाच प्रातिनिधिक उल्लेख आहे. त्यामुळेच इतर नव्वद घटनांची नोंद केलेली नाही एवढेच, पण त्यांचा अंतर्भाव अभ्यासात नक्कीच झालेला आहे.
दरवर्षी कॅलेंडर (दिनदर्शिका) निघते, कारण त्यामागे एक निश्चित स्वरूपाचे गणिती सूत्र आणि रचना असते परंतु ह्या येणार्‍या ‘तिसर्‍या महायुद्धाचे कॅलेंडर मात्र दररोज नवीन असेल. सर्वसामान्य माणसाला ह्या तिसर्‍या महायुद्धाची निदान २% तरी ओळख व्हावी, म्हणून केलेला हा लेखनप्रपंच.
Book
eBook

मी पाहिलेला बापू – मराठी

250.00

सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू म्हणजे विविधांगी व वैशिष्ट्यपूर्ण पैलूंनी भरलेले एक अद्वितीय व्यक्तिमत्व! ह्या असाधारण व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा एक प्रयास म्हणून, ‘दैनिक प्रत्यक्ष’चे सन २०१२ व २०१३ चे ‘नववर्ष विशेषांक’ ‘मी पाहिलेला बापू’ ह्या विषयाला वाहिलेले होते. बापूंच्या शालेय जीवनापासून ते वैद्यकीय प्रॅक्टिसच्या काळात अनेकविध लोकांना त्यांचे सान्निध्य लाभले. अशा, बापूंच्या सान्निध्यात आलेल्या अनेकविध लोकांच्या, अनिरुद्धांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू दाखविणाऱ्या, त्या काळातील आठवणी त्यांमध्ये शब्दांकित करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर काही मोजक्या व्यक्तिमत्वांच्या, अलिकडील काळातील आठवणींचाही त्यात समावेश करण्यात आला होता. बापूंच्या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारे ‘दैनिक प्रत्यक्ष’चे हे दोन्ही अंक अविस्मरणीय असेच ठरले होते.

ह्या सर्व लेखांचे संकलन असलेले, “मी पाहिलेला बापू” हे पुस्तक २०१७मध्ये गुरुपौर्णिमेच्या मंगल दिनी प्रथम मराठी व हिंदी ह्या दोन भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर अल्पावधीतच इंग्रजी भाषेतील पुस्तकही प्रकाशित झाले.

Book
eBook

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – मराठी

275.00

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ १९२५ साली स्थापन झाला. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी रोवलेल्या या बीजाचे आता विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या वटवृक्षाच्या शाखा किती, पाने किती याची मोजदाद करणे अवघड आहे. पण ही संघटना भारतीय जनमानसात खूप खोलवर आपली मुळे रोवून समर्थपणे उभी आहे आणि वटवृक्षाच्याच गती आणि शैलीने विकास करीत आहे. बालपणापासून संघाशी जोडले गेलेले आणि सारे जीवन संघाला वाहिलेले ‘रमेशभाई मेहता’ यांनी संघाचा इतिहास दैनिक प्रत्यक्ष मध्ये लेखमालेच्या स्वरुपात आपल्यासमोर मांडला. संघासाठी आणि संघाच्या मार्फत समाजासाठी, संस्कृतीसाठी, मातृधर्माच्या अभ्युदयासाठी प्रयत्न करणारे रमेशभाई म्हणजे केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच नाही, तर स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा ‘चालता बोलता इतिहास’च आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात संपन्न कुटुंबात जन्म झालेल्या रमेशभाईनी बालपणी संघाच्या शाखेत पाऊल ठेवले; आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक पाऊल संघाच्या निर्देशानेच पडत राहिले आणि आजही त्यांची ही वाटचाल सुरू आहे.

Continue reading....