Shop

250.00

तिसरे महायुद्ध – मराठी

ह्या पुस्तका विषय केवळ दहशतवाद वा दहशतवादविरोधी युद्धा हा नसून, पुढील काळात उलगडत जाणार्‍या जागतिक घडामोडींच्या शक्यतांचा विचार आतापर्यंत घडलेल्या घटनांच्या अभ्यासाच्या आधारे करणे हा आहे. संघर्ष हाच पुढील जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षांसाठी पृथ्वीच्या पाठीवर प्रत्येक ठिकाणी दैनंदिन व्यवहार होणार आहे.
हे भविष्यकथन नव्हे. हा अभ्यास आहे इतिहासाचा आणि सद्य: स्थितीचा आणि हे संशोधन आहे, जागतिक रंगमंचावरील पात्रांच्या मनोगतांचे. पुढे येणार्‍या वीस वर्षात अक्षरश: शेकडो ठिकाणी हजारो घटना घडणार आहेत तर येथे फक्त मोजक्या दहांचाच प्रातिनिधिक उल्लेख आहे. त्यामुळेच इतर नव्वद घटनांची नोंद केलेली नाही एवढेच, पण त्यांचा अंतर्भाव अभ्यासात नक्कीच झालेला आहे.
दरवर्षी कॅलेंडर (दिनदर्शिका) निघते, कारण त्यामागे एक निश्चित स्वरूपाचे गणिती सूत्र आणि रचना असते परंतु ह्या येणार्‍या ‘तिसर्‍या महायुद्धाचे कॅलेंडर मात्र दररोज नवीन असेल. सर्वसामान्य माणसाला ह्या तिसर्‍या महायुद्धाची निदान २% तरी ओळख व्हावी, म्हणून केलेला हा लेखनप्रपंच.

Know The Author

"Dr. Aniruddha D. Joshi, fondly known as Sadguru Shree Aniruddha (Bapu), (M.D. – Medicine - Consulting Rheumatologist) began delivering discourses from the year 1996 on subjects like the Vishnu Sahasranama, the Lalita Sahasranama, the Radha Sahasranama, the Ramraksha Stotra, and the Shree Sai Satcharita to name a few. "