Book

  • Showing all 14 results

  • Filters
  • Filters
Book
eBook

Rashtriya Swayamsevak Sangh – English

300.00

The ‘Rashtriya Swayamsevak Sangh’ was founded in the year 1925. The seed that Dr. Keshav Baliram Hegde sowed ninety years back has now grown into a huge Banyan tree – a ‘vatavriksha’ of immense expanse and stature. So, just how many branches and how many leaves this vast ‘Vatavriksha’ might have, is not in the least easy to keep count of. The fact remains all the same that this organisation stands erect – tall and competent, its roots embedded very deep in the Bharatiya mind and mindset. It is developing at the pace and on the lines of the ‘Vatavriksha’ – an expansive Banyan tree indeed.

Rameshbhai Mehta, who has been associated with the Sangh since his childhood and who has dedicated his life to the Sangh, has presented its history before us. Rameshbhai strives for the sake of the Sangh and, by means of the Sangh, for the sake of the society, the culture and the progress and welfare of his dharma. He is himself, ‘History – live’, not only of the Rashtriya Sangh but also of many events of consequence in the post-independence era. Born in the pre-independence era in a wealthy family, Rameshbhai was still a child when he first stepped into the ‘Shakha’ of the Sangh. Then on, at every step in life, he was guided by the Sangh, and so it is even today.

From the initial days, several political organisations have opposed the Sangh ideology. The Sangh has also faced a brief ban during the British rule, in 1948, during Emergency days (1975-77) and after the Ayodhya issue (1992). However, the two opposing streams of thought about the Sangh do admittedly end up surprising the common man. Through decades, the Bharatiya common man has been witnessing, on the one hand, a huge multitude associating with the Sangh and on the other, many people who launch vehement attacks and dish out nasty flak against the Sangh’s ideology.

Hence the need to understand the Sangh! It would be advisable to understand the ideology of the Sangh objectively, its contribution right from its inception until today, and, of course, its significance. To accept a certain ideology or to reject it is indeed a matter of individual choice. But, even the wise do not decline the idea of being open to understanding a given concept before opting to accept or even reject it. And what better means to do so than a dialogue? This very dialogue about the Rashtriya Swayamsevak Sangh appeared as an article series in Dainik Pratyaksha – ‘Chalta Bolta Itihaas‘ (History – live’ – in person).

This series of articles in Marathi got further translated into Hindi, English and Gujarati, and published in a book form in all four languages. On 29th April 2017, a ceremony for the same was held where the unveiling of the books happened at the hands of the then Governor of Uttar Pradesh, Hon’ble Shri. Ram Naik, Union Minister of Road Transport & Highways Shri. Nitin Gadkari, Member of Parliament in Rajya Sabha and head of Essel Group, Dr. Subhash Chandra.

In this book, Rameshbhai Mehta has presented the history of India, unknown to the common masses, along with the journey of the Sangh from 1925 to 1996. It covers the events from when Dr. Hegdewar founded the Sangh, the motivation behind it, Dr. Golwalkar Guruji – the second Sarsanghachalak up to Balasaheb Deoras – the third Sarsanghachalak. Besides, the book also contains information about the various organisations founded by the Sangh to bring together multiple elements of the society viz., women, students, tribals, labourers, etc. It is hoped that the book will throw light on various conceptions and misconceptions about the Sangh prevalent in society.

Continue reading....
Book
eBook

Textbook of Disaster Management – English

250.00

Going by the increasing trend of disasters happening around us be its natural or manmade, it would, in due course of time, become incumbent upon every citizen of this country to be aware of how to respond to and handle disasters. This textbook facilitates this.

Book
eBook

The Bapu that I have known – English

225.00

Sadguru Shree Aniruddha Bapu is a unique personality full of diverse and distinctive aspects! The 2012 and 2013 New Year issues by Dainik Pratyaksha titled, ‘The Bapu that I have known’, were attempts to fathom this extraordinary personality. People from various walks of life experienced came in close contact with Dr. Aniruddha D. Joshi starting from his school days, and till the time he was into full-time medical practice. This book brings before us the rich and diverse experiences from those times of many of these people. They personify the multi-faceted nature of Bapu before us. Moreover, a few experiences from recent years also feature in the book.

The collection of these articles in the form of a book, ‘The Bapu that I have known’, was published in Hindi and Marathi in the year 2017 on the auspicious day of Gurupournima. Later, the English version of the same too was released within no time.

Book
eBook

The Third World War – English

250.00

The subject of this book is not merely terrorism or anti-terrorism war based on the study of events that have occurred till now; it is a reflection over the possibilities that will unravel in the times to come. There is no doubt that over the next twenty to twenty-five years, conflict will become an aspect of everyday doings and in every region on earth. This is not telling the future. This is a study, a study of history and of the present circumstances…

Book
eBook

आपत्कालीन व्यवस्थापन – मराठी

250.00

अनेक आपत्तींची टांगती तलवार सातत्याने मानवाच्या डोक्यावर आहे. नैसर्गिक आपत्ती  उदा. भूकंप , वादळे, पूर , भूस्खलन , दुष्काळ  इ. चे आघात होतच असतात. मानवनिर्मीत आपत्ती उदा. मोठे अपघात , रासायनिक, जैविक व आण्विक  युद्धे यातही जग होरपळून निघतच आहे. या सर्व आपत्तींमुळे जीवितहानी, आर्थिक व सामाजिक नुकसान होते, तसेच पर्यावरणावरही त्यांचा विपरीत परिणाम होतो.

या सर्व पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापनाचे महत्व ही आज राष्ट्रांची प्राथमिक गरज झाली आहे. ह्याची गरज जशी सरकारला आहे, तशीच, किंबहुना त्याहीपेक्षा अधिक देशातील नागरिकांना. कारण, कोणत्याही आपत्तीत सर्वसामान्य नागरिकच होरपळून निघतात. यासाठी आपत्कालीन व्यवस्थ्यापनात नागरिकांचा थेट सहभाग आवश्यक आहे. 

ऑगस्ट २००१ मध्ये डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी, एम. डी. (मेडिसिन)  ह्यांनी बदलत्या काळाची पावले ओळखून ’डिसास्टर मॅनेजमेंट अ‍ॅकॅडमी’ची संकल्पना मांडली व त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनिरुद्धाज्‌ अ‍ॅकॅडमी ऑफ डिसास्टर मॅनेजमेंट ची स्थापना झाली. ही अ‍ॅकॅडमी स्थापन होताच प्रथम प्राधान्य दिले गेले, ते संपूर्ण, सर्वसामावेशक अशा स्वरूपातील ’डिसास्टर मॅनेजमेंट’ अर्थात ’आपत्तीनिवारण’ ह्या विषयावरील पुस्तक तयार करण्याला. ह्या पुस्तकाच्या आधारे आजमितीस (म्हणजेच जुलै २०२१ पर्यंत) आपल्या देशातील जवळपास ८४,००० हजारापेक्षाही अधिक नागरिकांना ह्या विषयाचे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्येही हा विषय आता समाविष्ट केला गेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ह्या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल.

आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीला, मग ती कुठल्याही  जाती, धर्माची असो, तीला नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापनात सज्ज करणे हे अनिरुद्धाज्‌ अ‍ॅकाडेमी ऑफ डिसास्टर मॅनेजमेंट चे ध्येय आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे सर्वसमावेशक प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाने घेणे ही काळाची गरज आहे. प्रशिक्षणार्थींना वैद्यकीय मदत येईपर्यंत बचाव पद्धती , प्राथमिक प्रथमोपचार, कार्डिओ पल्मनरी सेरेब्रल रीसिसिटेशन (सीपीसीआर) मध्ये तयार करणे आणि सुसज्ज करणे हे महत्वाचे कार्य आहे. यामुळे आपत्तीच्या कारणाने होणारे नुकसान कमी होते तसेच जखमी व्यक्तिंचा जीव वाचविण्यामध्येही मदत होते. हे पुस्तक यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

ह्या पुस्तकाची शैली अत्यंत सहज व सोपी असून ह्यात आपत्तीचे प्रकार, आपत्तींना देण्यात येणारा प्रतिसाद, प्रतिबंधक उपाय अशा अनेकविध विषयांचा समावेश आहे. तसेच या पुस्तकात काळाला अनुरुप बदलही करण्यात आले आहेत. ह्या पुस्तकातील मार्गदर्शन, माहिती व सूचना यांचे योग्य प्रकारे पालन केल्याने योग्य प्रकारे आपत्तीच्या घडीला समर्थपणे सामोरे जाता येईल, ही मात्र निश्चित गोष्ट आहे.

Continue reading....

Book
eBook

गर्द सभोवती – मराठी

350.00

प्रत्येक माणसाच्या जीवनात अनेक व्यक्ती येतात, प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात. काही व्यक्ती मनाच्या खोल खोल कप्प्यात कुठेतरी जाऊन बसतात. बालपणीच्या काही घटना मनात घर करून राहतात. निर्सगाचेही विविध पैलू आपण आपल्या मनात साठवत असतो. अशा अनेक चांगल्या आठवणींची शिदोरी प्रत्येकाकडे असते. आशालता वाबगावकर यांनीही आपल्या जीवनप्रवासातील आठवणींच्या साठवणी लेखमालेच्या स्वरूपात ’दैनिक प्रत्यक्ष’ या बिगर राजकिय वर्तमानपत्रात लिहिल्या व या लेखमाला ’गर्द सभोवती’या पुस्तकात सामाविष्ट करून दि. २६ जून २०१७ रोजी सचिन खेडेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

          संगीत नाट्यसृष्टीत व चित्रपट क्षेत्रात आपल्या कसदार अभिनयाचा ठसा उमटविणार्‍या चतुरस्त्र अभिनेत्री म्हणून आशालता वाबगावकर या रसिकांना परिचीत आहेतच. आशालता यांचा जन्म मुंबईचा. गिरगावातील ‘सेंट कोलंबो हायस्कूल’मधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. तेव्हाच्या अकरावी मॅट्रिकनंतर त्यांनी काही काळ मंत्रालयात नोकरीही केली. त्याच वेळी नोकरी सांभाळून कला शाखेतून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी’ (एसएनडीटी) महिला विद्यापीठातून त्यांनी ‘मानसशास्त्र’ विषयात ‘एम.ए.’ केले.

          आशालता ह्यांनी विविध भाषांतील शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला. ‘दि गोवा हिंदू असोसिएशन’ या संस्थेने महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत सादर केलेल्या ‘संगीत संशयकल्लोळ’या नाटकातील रेवतीच्या भूमिकेतून आशालता वाबगावकर यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. पुढे ‘चंद्रलेखा , ‘मुंबई मराठी साहित्य संघ’, ‘माऊली प्रॉडक्शन’, ‘कलामंदिर’, ‘आयएनटी’ आदी नाटय़संस्थांमधून  त्यांनी  नाटकांचे  प्रयोग केले. ‘मत्स्यगंधा’ या  संगीत  नाटकातील  त्यांची  भूमिका  प्रचंड  गाजली.

          अभिनयात सक्रिय असतानाच त्यांनी गायनाची आवडही जोपासली. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले होते. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर त्यांनी काही कोंकणी गाणीही गायली आहेत, तसेच कल्याणजी-आनंदजी यांच्या वाद्यवृंदामध्येही काही काळ गाणी गायली आहेत.

          प्रसिद्ध मराठी अभिनेते सुबोध भावे यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. यात ते म्हणतात, “या लिखाणात मला संवेदनशील मनाचं व्यक्तीचं प्रतिबिंब जाणवत आहे. आजूबाजूच्या दुलर्क्षित केलेल्या घटनांकडे बघून… त्यांचा अंदाज बांधून त्यावर स्वतःचे विचार व्यक्त करणं, हे मला वाटतं आशाताईंमधल्या संवेदनशील माणसाची अन्‌ कलाकाराची ओळख आहे. किती वैविध्यपूर्ण लिखाण त्यांनी या सदरात केलं आहे. अनेक गोष्टींना वेगळ्या नजरेने… वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा अंदाज हा आपल्याला स्पर्शून जातो. बऱ्याचवेळा कलाकार ज्यावेळी स्तंभलेखन करतो वा सदरात लिखाण करतो, त्यावेळी तो त्याच्या कामाविषयी चित्रपट, नाटक वा मालिका यांच्या सहभागाविषयी लिहितो. आशाताईंनी रोजच्या जगण्यातील कितीतरी संदर्भ इतक्या संवेदनशील पद्धतीने या लिखाणात मांडले आहेत की, ते वाचून थक्क व्हायला होतं. हे लिखाण त्यांच्या नावाप्रमाणेच आशादायी आहे. हे लिखाण प्रफुल्लित करणारं आहे.”

Continue reading....
Book
eBook

गुन्हेगारांचे कर्दनकाळ न्यायवैद्यक शास्‍त्र – मराठी

350.00

गुन्हेगारांचे कर्दनकाळ – न्यायवैद्यक शास्त्र– डॉ. वसुधा आपटे

आता अनेक चित्रपट व टि.व्ही. सिरीयल्स मुळे फोरेन्सिक सायन्स (न्यायवैद्यक शास्त्र) ही संकल्पना अनेकांना परिचीत आहे. एखादा गुन्हा घडल्यानंतर त्या गुन्ह्याचा फोरेन्सिक रिपोर्ट  गुन्हेगाराला पकडून देण्यास व त्याला कोर्टात योग्य ती शिक्षा देण्यास महत्वाची भूमिका बजावतो. न्यायवैद्यक शास्त्र ह्याबाबत सामान्य माणसांना जरी प्रचंड उत्सुकता असली तरी त्यातील फारच थोडी माहिती असते. डॉ. वसुधा आपटे ह्या न्यायवैद्यक शास्त्रातील प्राध्यापिका व तज्ज्ञ आहेत. अनेक किचकट व अवघड वाटणार्‍या प्रकरणांमध्ये त्यांनी न्यायालयास मदत केली आहे. 

जे ज्ञान त्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना देत असत किंवा न्यायालयात त्या ज्ञानाच्या आधारे साक्ष देत असत, ते सर्व ज्ञान अतिशय साध्यासोप्या व सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत यावे म्हणून ’दैनिक प्रत्यक्ष’ मध्ये त्यांनी या विषयावर लेखमाला लिहीली. या लेखमालेतील लेखांचे इंग्रजीमध्येही भाषांतर केले गेले, व दि. २६ जून २०१७ रोजी निवृत्त पोलिस महासंचालक श्री. प्रवीण दिक्षित  यांच्या उपस्थितीत या सर्व लेखांचे मराठी व इंग्रजी पुस्तकाच्या स्वरुपात प्रकाशन झाले. न्यायवैद्यक शास्त्र ह्या विषयावर इंग्रजीत अनेक पुस्तके आहेत परंतु मराठीमध्ये मात्र ह्या प्रकारचे हे पहिलेच पुस्तक आहे.

आपल्या पणजी रमाबाई रानडे यांचा वारसा पुढे नेणार्‍या डॉ. वसुधा आपटे ह्या सुमारे ३५ वर्ष एवढा प्रदीर्घ अनुभव असलेल्या महाराष्ट्रातील एकमेव महिला न्यायवैद्यकतज्ञ आहेत. आपले एम.बी.बी.एस. पूर्ण झाल्यावर ह्यांनी लग्नानंतर एम.डी. व एल.एल.बी. ची पदवी मिळवली. डॉ. वसुधा आपटे या नायर हॉस्पीटल  व सूरत येतील ’इस्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अ‍ॅंड रिसर्च’ येथे ’फोरेन्सिक मेडिसीन आणि टॉक्सिकॉलॉजी’ विभागाच्या प्रमुख तसेच नायरसंलग्न टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालय येथे प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या.

या पुस्तकाची प्रस्तावना निवृत्त पोलिस महासंचालक श्री. प्रवीण दिक्षित यांनी लिहीली आहे. यात ते लिहितात, “जरी हे पुस्तक डॉ. वसुधा आपटे यांनी सर्वसामान्यांसाठी लिहिलेले असले तरी तपासासाठी अत्यंत उपयोगी असल्याने ते सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या तपासातील त्रुटी कमी करण्यासाठी’कोश’ म्हणून वापरावे इतके उत्कृष्ट आहे. ह्या पुस्तकामध्ये जवळ जवळ १३० विविध विषयांचा ऊहापोह, सर्व शास्त्रीय माहिती देऊन, ती अतिशय रोचक पध्दतीने वाचकांसमोर आणलेली आहे. न्यायवैद्यक शास्त्राच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचा त्या गुन्ह्याशी संबंध सिद्ध झाल्यानंतर त्या व्यक्तीस शिक्षा होते, तेव्हा ती निर्विवाद असते. गुन्ह्याचा तपास हा शास्त्रोक्त पद्धतीने करायचा असल्यास, ते फक्त न्यायवैद्यक शास्त्राचा अभ्यास करण्यानेच शक्य आहे. ज्या गुन्ह्यात कोणीही माहिती देत नाही व बर्‍याच वेळेला पीडित व्यक्ती मृत असते आणि जर हे गुन्हे विशेषतः कुटुंबांतर्गत असतील तर ते फक्त न्यायवैद्यक शास्त्रामुळेच उघडकीस येऊ शकतात.”

हे पुस्तक प्रकाशीत झाल्यापासून आतापर्यंत संबंधित कायद्यांमध्ये बदल झाले आहेत, संशोधनामुळे नविन माहिती उपलब्ध झाली आहे. निदानतंत्र व उपाचारातही बदल झाले आहेत, तरीही न्यायवैद्यक शास्त्र या विषयाबद्द्ल समाजात असलेले अनेक समज – गैरसमज यावर हे पुस्तक प्रकाश टाकेल व अनेकांना मार्गदर्शक ठरेल याची खात्री वाटते. 

Continue reading....
Book
eBook

तिसरे महायुद्ध – मराठी

250.00
ह्या पुस्तका विषय केवळ दहशतवाद वा दहशतवादविरोधी युद्धा हा नसून, पुढील काळात उलगडत जाणार्‍या जागतिक घडामोडींच्या शक्यतांचा विचार आतापर्यंत घडलेल्या घटनांच्या अभ्यासाच्या आधारे करणे हा आहे. संघर्ष हाच पुढील जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षांसाठी पृथ्वीच्या पाठीवर प्रत्येक ठिकाणी दैनंदिन व्यवहार होणार आहे.
हे भविष्यकथन नव्हे. हा अभ्यास आहे इतिहासाचा आणि सद्य: स्थितीचा आणि हे संशोधन आहे, जागतिक रंगमंचावरील पात्रांच्या मनोगतांचे. पुढे येणार्‍या वीस वर्षात अक्षरश: शेकडो ठिकाणी हजारो घटना घडणार आहेत तर येथे फक्त मोजक्या दहांचाच प्रातिनिधिक उल्लेख आहे. त्यामुळेच इतर नव्वद घटनांची नोंद केलेली नाही एवढेच, पण त्यांचा अंतर्भाव अभ्यासात नक्कीच झालेला आहे.
दरवर्षी कॅलेंडर (दिनदर्शिका) निघते, कारण त्यामागे एक निश्चित स्वरूपाचे गणिती सूत्र आणि रचना असते परंतु ह्या येणार्‍या ‘तिसर्‍या महायुद्धाचे कॅलेंडर मात्र दररोज नवीन असेल. सर्वसामान्य माणसाला ह्या तिसर्‍या महायुद्धाची निदान २% तरी ओळख व्हावी, म्हणून केलेला हा लेखनप्रपंच.
Book
eBook

तृतीय महायुद्ध – हिंदी

250.00

तीसरा सह्स्त्रक शुरु होते – होते ही अर्थात ११ सितम्बर २००१ से विश्व का हर एक राष्ट्र अपनी अपनी रक्षा एवं भविष्याकालीन राजनीतिक रवैयों का नये से पुनर्विचार करने लगा। विश्व के अधिकतर प्रमुख राष्ट्रों को आतंकवादी चेहेरे की अच्छी खासी पहचान ईससे पूर्व ही हो चुकी थी। अमरिका एवं रशिया ने तो आतंकवादी संगठनों को प्रोत्साहित कर एक दुसरे के खिलाफ़ ऊनका ईस्तेमाल भी किया था।

Book
eBook

मी पाहिलेला बापू – मराठी

250.00

सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू म्हणजे विविधांगी व वैशिष्ट्यपूर्ण पैलूंनी भरलेले एक अद्वितीय व्यक्तिमत्व! ह्या असाधारण व्यक्तिमत्वाचा वेध घेण्याचा एक प्रयास म्हणून, ‘दैनिक प्रत्यक्ष’चे सन २०१२ व २०१३ चे ‘नववर्ष विशेषांक’ ‘मी पाहिलेला बापू’ ह्या विषयाला वाहिलेले होते. बापूंच्या शालेय जीवनापासून ते वैद्यकीय प्रॅक्टिसच्या काळात अनेकविध लोकांना त्यांचे सान्निध्य लाभले. अशा, बापूंच्या सान्निध्यात आलेल्या अनेकविध लोकांच्या, अनिरुद्धांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू दाखविणाऱ्या, त्या काळातील आठवणी त्यांमध्ये शब्दांकित करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर काही मोजक्या व्यक्तिमत्वांच्या, अलिकडील काळातील आठवणींचाही त्यात समावेश करण्यात आला होता. बापूंच्या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारे ‘दैनिक प्रत्यक्ष’चे हे दोन्ही अंक अविस्मरणीय असेच ठरले होते.

ह्या सर्व लेखांचे संकलन असलेले, “मी पाहिलेला बापू” हे पुस्तक २०१७मध्ये गुरुपौर्णिमेच्या मंगल दिनी प्रथम मराठी व हिंदी ह्या दोन भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर अल्पावधीतच इंग्रजी भाषेतील पुस्तकही प्रकाशित झाले.

Book
eBook

मैंने देखे हुए बापू – हिंदी

250.00

सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू एक हरफनमौला एवं विशेष पहलुओं से परिपूर्ण अद्वितीय व्यक्तित्व हैं! इस असाधारण व्यक्तित्व का अवलोकन करने के प्रयास के रूप में, ’दैनिक प्रत्यक्ष’ के सन २०१२ एवं २०१३ के ’नववर्ष विशेषांक’ ’मैंने जाना हुआ बापू’ इस विषय पर आधारित थे। बापूजी के शालेय जीवन से लेकर वैद्यकीय प्रैक्टिस के दौर में कई लोग उनके सान्निध्य में आए। ऐसे, बापूजी के सान्निध्य में आए हुए कई लोगों की, अनिरुद्धजी के विभिन्न पहलुओं को दर्शानेवाली, उस दौर की उनकी यादें शब्दांकित की गई थीं। इसके अलावा कुछ गिनेचुने व्यक्तित्वों की, नजदीकी दौर की यादों का भी उनमें समावेश किया गया था। बापूजी के अनोखे व्यक्तित्व पर रोशनी डालनेवाले ’दैनिक प्रत्यक्ष’ के वे दोनों अंक अविस्मरणीय साबित हुए थे।

इन सारे लेखों का संकलन किया हुआ ’मैंने जाना हुआ बापू’ नामक पुस्तक सन २०१७ में गुरुपूर्णिमा के शुभ दिन प्रथम मराठी एवं हिन्दी इन दो भाषाओं में प्रकाशित की गई। इसके बाद बहुत जल्द अंग्रेजी में भी यह पुस्तक प्रकाशित किया गया।

Book
eBook

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – मराठी

275.00

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ १९२५ साली स्थापन झाला. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी रोवलेल्या या बीजाचे आता विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या वटवृक्षाच्या शाखा किती, पाने किती याची मोजदाद करणे अवघड आहे. पण ही संघटना भारतीय जनमानसात खूप खोलवर आपली मुळे रोवून समर्थपणे उभी आहे आणि वटवृक्षाच्याच गती आणि शैलीने विकास करीत आहे. बालपणापासून संघाशी जोडले गेलेले आणि सारे जीवन संघाला वाहिलेले ‘रमेशभाई मेहता’ यांनी संघाचा इतिहास दैनिक प्रत्यक्ष मध्ये लेखमालेच्या स्वरुपात आपल्यासमोर मांडला. संघासाठी आणि संघाच्या मार्फत समाजासाठी, संस्कृतीसाठी, मातृधर्माच्या अभ्युदयासाठी प्रयत्न करणारे रमेशभाई म्हणजे केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच नाही, तर स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा ‘चालता बोलता इतिहास’च आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात संपन्न कुटुंबात जन्म झालेल्या रमेशभाईनी बालपणी संघाच्या शाखेत पाऊल ठेवले; आणि त्यानंतर त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक पाऊल संघाच्या निर्देशानेच पडत राहिले आणि आजही त्यांची ही वाटचाल सुरू आहे.

अनेक राजकीय पक्ष हे सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या विचारसरणीला विरोध करत आलेले आहेत. इंग्रजांच्या राजवटीत तसेच १९४८ साली, आणीबाणीच्या काळात (१९७५-१९७७) आणि १९९२ साली अयोध्या प्रकरणानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर काही काळ बंदीही घालण्यात आली होती. जनसामान्य मात्र संघाबाबतच्या दोन मतप्रवाहामुळे चकित होत असतात. एकीकडे संघाशी जोडला गेलेला विशाल जनसमुदाय, तर दुसरीकडे संघावर तुटून पडणारी, संघाच्या विचारधारेवर जहाल टीका करणारी मंडळी, असे चित्र सर्वसामान्य भारतीय गेली अनेक दशके पाहत आहे. म्हणूनच संघाचे विचार, संघाने दिलेल्या योगदानाची माहिती आणि ह्याचे महत्त्व तटस्थपणे समजून घेणे अधिक श्रेयस्कर ठरेल. कुणाचे विचार स्वीकारायचे किंवा नाकारायचे, याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असतेच. पण विचार स्वीकारण्याच्या अथवा नाकारण्याच्या आधी, ते विचार नीट समजून घेण्याची प्रक्रिया प्रगल्भ मंडळी कधीही टाळत नाहीत आणि ‘संवाद’हा या प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा भाग ठरतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबतीतला हाच संवाद म्हणजे ‘दैनिक प्रत्यक्ष’ची मध्ये आलेली लेखमाला – ‘चालता बोलता इतिहास’!

या मराठी लेखमालेचे हिंदी. इंग्रजी व गुजराती भाषांमध्येही भाषांतर झाले व ते पुस्तक रूपाने प्रसिध्दही झाले. या चारही भांषेंमधील पुस्तकांचा अनावरण सोहळा उत्तर प्रदेश चे माननीय राज्यपाल श्री. राम नाईक, केंद्रीय वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी, राज्यसभा सदस्य व एस्सेल ग्रुप उद्योग समूहाचे प्रमुख डॉ. सुभाष चंद्रा यांच्या हस्ते दि. २९ एप्रिल २०१७ रोजी पार पडला.

रमेशभाई मेहता यांनी सर्वसामान्यास अपरिचीत असणार्‍या आपल्या देशाचा इतिहासाबरोबरच १९२५ पासून १९९६ पर्यंतचा संघाचा प्रवास या पुस्तकात  मांडलेला आहे. डॉ. हेगडेवारांनी संघाची स्थापना केल्यापासूनची वाटचाल, त्यामागची प्रेरणा, द्वितीय सरसंघचालक श्री. गोळवलकर गुरुजी आणि तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यापर्यंतची माहिती या पुस्तकात सामाविष्ट करण्यात आली आहे. तसेच विविध समाज घटकांना (उदा. महिला, विद्यार्थी, वनवासी, कामगार इ.) एकत्र बांधण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक संघटनांची स्थापना केली याचीही माहिती या पुस्तकात मिळते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल समाजात असलेले अनेक समज – गैरसमज यावर हे पुस्तक प्रकाश टाकेल अशी आशा वाटते.

Continue reading....

Book
eBook

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ – हिंदी

275.00

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की स्थापना सन 1925 में हुई। डॉ. केशव बळीराम हेडगेवार ने नब्बे वर्ष पहले बोये हुए बीज का रूपान्तरण अब एक विशाल वटवृक्ष में हो चुका है। इस वटवृक्ष की शाखाएँ कितनीं, पत्ते कितने इसकी गिनती करना मुश्किल है। लेकिन यह संगठन भारतीय जनमानस में बहुत ही दृढ़तापूर्वक अपनी जड़ें फ़ैलाकर समर्थ रूप में खड़ा है और वटवृक्ष की ही गति एवं शैली में विकास कर रहा है। केवल देश में ही नहीं, बल्कि जहाँ कहीं भी भारतीय हैं, उन सभी देशों में संघ कार्यरत है ही। इतना ही नहीं, बल्कि विदेशस्थित भारतीयों को अपने देश के साथ, संस्कृति के साथ दृढ़तापूर्वक जोड़कर रखनेवाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यह मात्र एक संगठन नहीं, बल्कि परंपरा बन चुका है।

Book
eBook

રાષ્ટ્રીય સ્વયંસેવક સંઘ – ગુજરાતી

275.00

૧૯૨૫ની સાલના દશેરાના શુભદિને રાષ્ટ્રીય સ્વયંસેવક સંઘ ની સ્થાપના થઈ. ડૉ. કેશવ બળીરામ હેડગેવારજીએ નેવું વર્ષ પૂર્વે જેનું બીજારોપણ કરેલું એ વટવૃક્ષની આજે કેટકેટલી શાખાઓ વિસ્તરી છે, એના જે વિધવિધ પર્ણો પલ્લવિત થયાં છે એની ગણતરી કરવી કઠિન છે. પરંતુ આજે ભારતીય જનમાનસમાં આ સંગઠનના મૂળ ઊંડે સુધી વિસ્તરેલાં છે અને એ પણ સમર્થ અને સશક્તપણે અને આજે આ સંગઠન વટવૃક્ષની ગતિ અને શૈલી પ્રમાણે વિકાસ કરી રહ્યું છે. આ સંગઠનનો પ્રસાર માત્ર ભારત પૂરતો જ મર્યાદિત નથી રહ્યો પણ પરદેશમાં સુધ્ધાં જે જે સ્થળે ભારતીય વસેલ છે ત્યાં ત્યાં એની છાયા વિસ્તરી છે. સંઘની વિદેશમાંની શાખાઓ વિદેશવાસી ભારતીયોને પોતાની માતૃભૂમિ સાથે, મૂળભૂત સંસ્કૃતિ સાથે મજબૂત રીતે સાંકળી રાખનારી એક કડીરુપ છે. રાષ્ટ્રીય સ્વયંસેવક સંઘ એક સંસ્થા માત્ર નથી, એ સ્વદેશ સાથે સંયોજન કરનારી જીવનદોર છે! પરંપરા છે!